कल्याण प्रतिनिधी - कल्याण मध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी आळीपाळीने बलात्कार केला. कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घट

कल्याण प्रतिनिधी – कल्याण मध्ये राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार मुलांनी आळीपाळीने बलात्कार केला. कोळसेवाडी येथिल पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे. या अनुषंगाने
नी चार जणांना ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.कल्याण मधील राहणारी पंधरा वर्षीय पीडित तरुणी हिची इंस्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणांनी माझे प्रेयसी सोबत भांडण झाले आहे. असे सांगून
तिला भेटण्यास बोलवुन घेतले तसेच यावेळी तिला रूमवर घेऊन जात तीच्यावर अतिप्रसंग करत तिच्यावर बलात्कार केला , तसेच दुसऱ्या दिवशीही बोलवून तिच्यावर अतिप्रसंग केला तसेच यावेळी तिच्यावर अजून तीन जणांनी अतिप्रसंग केला.दरम्यान पीडित तरुणीच्या घरच्यांनी ती हरवली असल्याचे तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या अनुषंगाने तपास करत पीडित तरुणीची सुटका केली तसेच कोळसेवाडी पोलिसांनी अधिक तपासात केला असता तिच्यावर अतिप्रसंग झाला असल्याचे समोर आले. या अनुषंगाने पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले .यात एक अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. तर आरोपी साहिल राजभर , सुजल गवळी आणि विजय बेरा असे या आरोपींची नावे असून यातील एका अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे . तसेच पुढील तपास वरिष्ट पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे .या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घोडे हे करत आहेत.
COMMENTS