प्रेमसंबंधातून आई वडिलांसमोर अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रेमसंबंधातून आई वडिलांसमोर अल्पवयीन मुलीचे केले अपहरण

रामनगर पोलिसांनी आरोपीला केले अटक

वर्धा प्रतिनिधी -  तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, असे म्हणत चक्क आई अन् वडिलांसमोरच युवकाने अल्पवयीन मुलीला तिच्याच घरातून पळवून नेत पोबारा केला. मा

मध्यप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी चमत्कार केला- चौहान
मुग्धाची कविता’ हे बाल साहित्यातील आश्वासक पाऊल – प्रा.दासू वैद्य.
विरोधकांची तपास यंत्रणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

वर्धा प्रतिनिधी –  तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे, असे म्हणत चक्क आई अन् वडिलांसमोरच युवकाने अल्पवयीन मुलीला तिच्याच घरातून पळवून नेत पोबारा केला. मात्र, रामनगर पोलिसांच्या टिमने आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक केली. रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका परिसरात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह घरी हजर असताना आरोपी अंकुश जाखर याने अनाधिकृतपणे मुलीच्या घरात प्रवेश केला. मुलीच्या आई वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमनाता थेट मुलीच्या आई वडिलांसमोर तिचे अपहरण केले. दरम्यान पोलिसांनी आरोपी अंकुश जाखर याला बेड्या ठोकून कोठडीत पाठविले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

COMMENTS