Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीने युट्यूबवर व्हिडीओ पाहून स्वत:चीच केली प्रसूती

नागपूर प्रतिनिधी - गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला. हे बाळ रडल्

उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान – आमदार थोरात
नगर अर्बन सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंसह त्यांच्या चुलतीला वॉरंट
 यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

नागपूर प्रतिनिधी – गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला. हे बाळ रडल्यास साऱ्यांना माहिती होईल, आपले बिंग फुटणार या भीतीतून नंतर पट्ट्याने गळा आवळून त्याचा जीव घेतला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना नागपुरातील अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. ही १५ वर्षीय मुलगी नववीत शिकते. तिची आई खासगी काम करते. वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामवर तिची ठाकूर नावाच्या युवकासोबत ओळख झाली. दोघे चॅटिंग करायला लागले. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. ही गोष्ट तिने आईपासून दडवून ठेवली. दुसरीकडे यू-ट्यूब बघून प्रसूतीसाठी लागणारे साहित्य जमवून घरात दडवून ठेवले. शुक्रवारी दुपारी पोटात दुखायला लागले. दडवून ठेवलेले साहित्य बाहेर काढले. यू-ट्यूब बघून तिने स्वत: प्रसूती केली. बाळाला जन्म दिला. मात्र, बाळ रडल्यास शेजाऱ्यांना आवाज जाईल व बिंग फुटेल, या भीतीने तिच्या मनात घर केले. जवळच असलेल्या पट्ट्याने गळा आवळून तिने बाळाचा जीव घेतला. बाळाचा मृतदेह एका ट्रेमध्ये ठेवून सज्जावर दडविला. रात्री नऊच्या सुमारास आई कामावरून घरी परतली. तिला मुलीची प्रकृती खालावलेली दिसली. घरात काही ठिकाणी रक्ताचे डागही दिसल्याने तिने मुलीला विचारणा केली. घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. आईने तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी अंबाझरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी प्राथमिक तपास करून बाळाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली

COMMENTS