Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिन्यानंतर पुन्हा कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

कोयनानगर / प्रतिनिधी : गेल्या महिन्यात बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर 33 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना धरण परिसर मंगळवारी सकाळी 9.47 वाजता भू

कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी
राजारामबापू कारखाना हुकुमशाहीचा अड्डा : धैर्यशील मोरे
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

कोयनानगर / प्रतिनिधी : गेल्या महिन्यात बसलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर 33 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना धरण परिसर मंगळवारी सकाळी 9.47 वाजता भूकंपाच्या सौम्य धक्क्याने कोयनानगर परिसर हादरला. या परिसरात मंगळवारी सकाळी 9.47 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्‍चिमेला 7 किमी अंतरावर आहे.
8 जानेवारीनंतर 1 फेब्रुवारीला सकाळी 9.47 ला भूकंपाचा सौम्य धक्क्याने कोयना परिसर हादरला आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाच्या धक्क्याची खोली 45 इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच काडोली गावाच्या पश्‍चिमेस 7 किमी अंतरावर होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवलाय. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात 8 जानेवारी रोजी कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना विभागात हेळवाक या गावाजवळ होता. एका महिन्यानंतर याच परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू एक किमी पुढे सरकून तो काडोली गावाजवळ गेला. केंद्रबिंदू सरकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

COMMENTS