Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी स्मारक उभारणार

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसातील उपनिरीक्षक, अशोक चक्र पुरस्कार विजेते तु

बसवर ’जय महाराष्ट्र’ लिहून गाडीला फासले काळे; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचार्‍यांकडून स्वच्छता
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसातील उपनिरीक्षक, अशोक चक्र पुरस्कार विजेते तुकाराम ओंबळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी शहिद झाले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने ओंबळे यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक निवेदन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हे स्मारक तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी, सातारा जिल्ह्यातील केडांबे येथे बांधले जाईल. यासाठी 13.46 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर रकमेचा पहिला हप्ता 2.70 कोटी रुपये शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.

COMMENTS