Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजकल्याण विभागातर्फे तृतीयपंथीयांसाठी आज सातार्‍यात मेळावा

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनस्तरावरु

वारंवार भीक मागून त्या हॉटेल मालकाचे बिल भागवणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा
25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून
महिला धोरणाच्या मसुद्यावर अधिवेशनात चर्चा व्हावी : ना. रामराजे नाईक-निंबाळकर

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनस्तरावरुन होणार्‍या अनेकविविध योजनांचा भाग म्हणून 24 मे 2022 रोजी यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे फाटा, सातारा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीय पंथीयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.
तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 तसेच अधिनियम 2020 मधील नियम 6 व 7 नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजवीज आहे. ओळखपत्रासह तृतीयपंथींयांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन समाज कल्याण विभाग आणि शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या कै. अंकुशराव लांडगे सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट या संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पस, वाढे फाटा, सातारा येथे दि. 24 मे रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व तृतीयंपथीयांसाठी मानसिक आजारांबाबत जागृती शिबीर, तृतीयंपथीयांमध्ये कौशल्यविकास होण्यासाठी मागदर्शन तसेच सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल हीींिीं://ीींरपीसशपवशी.वेीक्षश.र्सेीं.ळप/ या पोर्टलच्या (छरींळेपरश्र झेीींरश्र ऋेी ढीरपीसशपवशी झशीीेपी) माध्यमातून जिल्ह्यातील नोंदणी न झालेल्या तृतीयपंथीयांची नोंदणी करण्यात येणार आहे. शासनामार्फत तृतीयंपथीयांसाठी आयोजित सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता समाज कल्याण निरिक्षक आशिष शिंदे यांना 9096709521 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.

COMMENTS