Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळला गणिताचा पेपर

बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पेपर फुटीप्रकरणाचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले असतांनाच, पुण्यात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो क

कर्करोग जनजागृती व उपचार ही काळाची गरज ः मंत्री महाजन
छोट्या बहिणींना मदत करण्यासाठी यशदायीनी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा -प्रा.सविता बुरांडे
मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः पेपर फुटीप्रकरणाचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले असतांनाच, पुण्यात दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने तसेच गणित भाग एकचा पेपरचे छायाचित्र महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने दाखल तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी 13 मार्चला दहावीचा गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. कांबळे यांच्या या कृतीमुळे पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान 15 मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले होते. यावेळी या पथकास महिला सुरक्षा रक्षकाचा संशय आला. तिच्याकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला. त्याची झाडाझडती घेतली असता गणित भाग एकच्या प्रश्‍नपत्रिकेचे फोटो मोबाईलमध्ये काढल्याचे समोर आले. यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. मात्र तिने उडवाउडविची उत्तर दिले. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी किसन भुजबळ यांच्या तक्रारीनूसार मनिषा कांबळे या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS