Homeताज्या बातम्यादेश

भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, 9 जवान शहीद 1 जखमी

लडाख प्रतिनिधी - केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहजवळील कायरी गावात लष्कराचे एक वाहन दरीत कोसळल

टेम्पो आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक; रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण दुर्घटना भर रस्त्यात कारला लागली आग.
वसईजवळील अपघातात तिघांचा मृत्यू

लडाख प्रतिनिधी – केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहजवळील कायरी गावात लष्कराचे एक वाहन दरीत कोसळले आहे. यात लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत सैनिकांमध्ये आठ सैनिक आणि एक जेसीओ यांचा समावेश आहे. तर, एक जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कायरी गावाच्या सात किमीपूर्वी लष्कराच्या वाहनाचा दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात आठ जवान आणि एका जेसीओचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जवानही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. लष्कराची हे वाहन कारूहून कायरीच्या दिशेने जात असताना अपघात झाला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

COMMENTS