Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हेळवाक येथे घरात घुसलेला बिबट्या जेरबंद

पाटण / प्रतिनिधी : हेळवाक, ता. पाटण येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. कारंडे घरातील सर्व हे देवी विसर्जनासाठी घराबाहेर होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लोकप्रतिनिधींच्या पत्राची गरज नाही : रामहरी राऊत
पैसे वाटपाच्या संशयावरून कराडमध्ये गुन्हा दाखल
वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम

पाटण / प्रतिनिधी : हेळवाक, ता. पाटण येथे सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला. कारंडे घरातील सर्व हे देवी विसर्जनासाठी घराबाहेर होते. बिबट्या आत कुत्र्याच्या मागे शिरला आणि हे पाहून कारंडे यांनी घराचे दार बंद केले. दरम्यान या घटनेची माहिती वन विभागाला देतात. वनविभागाची सर्व टीम वनक्षेत्रपाल घटनास्थळी पोहचली. दरम्यान, काल रात्री हेळवाक गावात सुधीर कारंडे यांच्या घरात घुसलेला बिबट्या वन्यजीव विभागाने यशस्वीरीत्या पिंजर्‍यात पकडला आहे.
रात्री उशीरा पर्यंत वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल (हेळवाक) संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल (कोयना) संदीप कुंभार व वन्यजीव विभागाचे वनपाल व वनरक्षक हे तत्परतेने घटनास्थळी पोहचले. बिबट्यास यशस्वीरीत्या पिंजर्‍यात जेरबंद केले आहे. बिबट्या हा लहान वयाचा असून त्याच्या एका डोळ्यास बहुतेक मोतीबिंदू सारखे आहे. तर मागील उजव्या पायास तो लंगडत आहे.
बिबट्यास वैद्यकीय पुढील उपचारासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या सूचनेनुसार पुढील उपचारासाठी हलविण्यात येणार आहे. बिबट्यास सुखरुप पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, सर्व वन्यजीव विभागाचे स्टॅफ यांनी अथक प्रयत्न केले. तसेच स्थानिकांनी ही मोठे सहकार्य केले.

COMMENTS