Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याने पाडला दोन कालवडीचा फडशा

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील वाळूंज वस्तीवर सोमवारी रात्री 11 वाजता दोन बिबट्याने एक वर्षाच्या कालवडीचा फडशा पाडला.परिसरात बिबट्यांनी धु

नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | DAINIK LOKMANTHAN
काल्याच्या कीर्तनाने वीरभद्र महाराज यात्रेची सांगता
जिल्हा परिषदेवर आज थाळी-लाटणे मोर्चा

देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील वाळूंज वस्तीवर सोमवारी रात्री 11 वाजता दोन बिबट्याने एक वर्षाच्या कालवडीचा फडशा पाडला.परिसरात बिबट्यांनी धुमाकुळ घातला असुन येथिल शेतकर्‍यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. देवळाली प्रवरा वाकाण वस्ती जवळील वाळुंज वस्ती येथिल संभाजी निवृत्ती वाळुंज यांच्या गोठ्यात सोमवारी राञी 11 वाजता दोन बिबट्याने एक वर्षाच्या कालवडीवर हल्ला करुन गोठ्यातील कालवड सुमारे पाचशे फुट ओढीत नेवून कालवडीचा फडशा पाडला.त्यावेळेस इतर जनावरे मोठ मोठ्यांनी ओरडत होते.वाळुंज यांनी बाहेर येवून पाहिले असता तीन ते चार फुट उंचीचे दोन बिबटे कालवडीचे लचके तोडीत असताना दिसले. आरडा-ओरड केल्यानंतर बिबट्यांनी धूम ठोकली. वनविभागास वाळुंज भ्रमणभाष वरुन माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यू.जे पाचरणे यांचे आदेशा अन्वये वनपाल आर एस रायकर व बाबासाहेब  सिनारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शेतकर्‍यांनी बिबट्या पासुन आपल्या पशुधनाची सुरक्षा करण्यासाठी लोखंडी जाळ्या बसाव्यात शेतात काम करताना शेतकरी व शेतमजुर यांनी गळ्यास मफलर सारखे जाड कापड गुंडाळावे अशा सुचना वनविभागाच्या वतीने करण्यात आल्या.

COMMENTS