Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यात वरवंडी येथिल वेदिका ढगे बालिकेवर बिबट्याने हल्ला करुन नरडीचा घोट घेतल्याची घटना ताजी असताना याच गावातील नवनाथ स

ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय स्वागतार्ह ः आ. आशुतोष काळे
मोदींना हवेत चारशे पार ! शिर्डीत मात्र दिसते हार !!
टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यात वरवंडी येथिल वेदिका ढगे बालिकेवर बिबट्याने हल्ला करुन नरडीचा घोट घेतल्याची घटना ताजी असताना याच गावातील नवनाथ सकाहरी ढगे हे मोटारसायकल वरुन पती पत्नी व दोन मुलासह रविवारी राञी साडेदहा वाजता घरी जात असताना वरवंडी भागात अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालुन हल्ला केला त्यात दुचाकीवरील चालकासह दोन मुले किरकोळ तर महिला गंभीर जखमी झालेली आहे.
             याबाबत समजलेली माहिती अशी की,वरवंडी ता.राहुरी येथिल  नवनाथ सकाहरी ढगे  हे रात्री साडेदहाच्या सुमारास मोटारसायकल वरुन  त्यांची पत्नी आणि दोन मुलांच्या सोबत घराच्या दिशेने चाललेले होते त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. दुचाकी पडल्यानंतर बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला.नवनाथ सकाहरी ढगे यांच्यासह दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत.माञ त्यांची पत्नी गंभीर जखमी झालेली आहे. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा उपद्रव वाढलेला पाहायला मिळत वनविभागाकडून अनेकदा पिंजरे लावण्यात येतात माञ गावकरी या भागात पिंजरे लावण्यासाठी पाहिजे तसे सहकार्य करीत नसल्याचे वनविभाचे कर्मचारी सांगतात. त्यामुळे देखील बिबटे ताब्यात येत नसल्याचे चित्र आहे.

COMMENTS