Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.क्षीरसागरांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांना दिलासा

ढेकणमोहा-घाटसावळी स्वतंत्र बसफेरी सुरु

बीड प्रतिनिधी -  ढेकणमोहा,मानकुरवाडी, आंबेसावळी,वलीपूर,घाटजवळा, मन्यारवाडी,घाटसावळी अशी स्वतंत्र बस आ. संदीप क्षीरसागर यांच्या विनंतीनुसार सुरू क

 काँग्रेस चे जहाज भरकटलेले आहे – राधाकृष्ण विखे पाटील
सुरुडी आश्रमशाळेच्या विद्यार्थींनीची सीमेवरील जवानांना राखीची स्नेह भेट
तृतीयपंथियांनी अंगावर ओतले रॉकेल…त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा | loknews24

बीड प्रतिनिधी –  ढेकणमोहा,मानकुरवाडी, आंबेसावळी,वलीपूर,घाटजवळा, मन्यारवाडी,घाटसावळी अशी स्वतंत्र बस आ. संदीप क्षीरसागर यांच्या विनंतीनुसार सुरू करण्यात आली आहे. या बसची पहिलीच फेरी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मंगळवार (दि.1) रोजी बसचे स्वागत केले.
बीड तालुक्यातील ढेकणमोह येथील गोरक्षनाथ महाविद्यालय येथे 1 ते 12 वी पर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे गोरक्षनाथ महाविद्यालय, ढेकनमोह येथे परिसरातील वलीपूर, घाटजवळा, मन्यारवाडी, आंबेसावळी, समतानगर, मानकुरवाडी, काळेगाव हवेली, मौजवाडी, मौज, जुजगव्हाण, ब्रम्हगाव यांसह इतर गावांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. यापूर्वी वलीपूर-जवळा-मन्यारवाडी-आंबेसावळी-समतानगर-ढेकणमोह अशी एक बसफेरी सुरु होती. मात्र या बसने प्रवास करणार्या विद्यार्थ्यांचीच संख्या 125 पेक्षा जास्त असल्याने विद्यार्थी व इतर प्रवासी यांना प्रवास करण्यासाठी प्रचंड अडचण होत होती. ही बाब लक्षात येताच आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्य परिवहन महामंडळाचे बीड विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून, पत्रव्यवहार करून हा विद्यार्थी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. यानंतरही मौज-मौजवाडी-ब्रह्मगाव-काळेगाव अशी एक बस फेरीही लवकरच कार्यान्वित करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्यामार्फत पाठपुरावा करणार असल्याचे भाऊसाहेब डावकर यांनी सांगितले.

COMMENTS