कोल्हापूर/प्रतिनिधी ः कोल्हापूर जिल्ह्यात सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याती
कोल्हापूर/प्रतिनिधी ः कोल्हापूर जिल्ह्यात सुट्टीसाठी घरी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात ही घटना घडली आहे. चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झालेल्या अविवाहित जवानाने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अस्पष्टता आहे.
शिवानंद आरबोळे गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. सध्या ते राजस्थानमधील कोटामध्ये कर्तव्यावर होते. अविवाहित असलेल्या शिवानंद लग्नासाठी स्थळे पाहणे सुरू होते. रविवारी शिवानंद कुटुंबियांसोबत शेतामध्ये गेले होते. यावेळी त्यांनी शेतामध्येच सगळ्यांसोबत जेवण केले. त्यानंत अंघोळीला जातो असे सांगून घरी आल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, वडिलांसह घरातील मंडळी सायंकाळी घरी आल्यानंतर शिवानंद यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वीही सुट्टीसाठी गावी आलेल्या जवानाच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्ळाळा तालुक्यात सुट्टीसाठी आलेल्या जवानाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सत्यजीत महादेव खुडे (वय 28) भारतीय सैन्यात कार्यरत होते. ते गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होते. 1 जानेवारीपासून ते आपल्या काखे गावी सुट्टीवर आले होते.
COMMENTS