सोमवतीनिमित्त कोरठण खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमवतीनिमित्त कोरठण खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

अहमदनगर : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा.ता.पारनेर येथील क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे सोमवती पर्वणी उत्सवानिमित्त राज

केंद्र सरकारचा साखर निर्यातीत कोटा पद्धतीचा डाव ; खुला परवाना देण्याऐवजी कारखानानिहाय कोटा देण्याचा विचार
व्हीडीओ कॉलवर क्यूआर कोडस्कॅन करून 51 हजार लुटले
आदर्श महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन

अहमदनगर : राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा.ता.पारनेर येथील क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे सोमवती पर्वणी उत्सवानिमित्त राज्यभरातून खंडोबाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी झाली कुलदैवताचे विविध धार्मिक विधी पार पाडीत देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा हजारो भाविकांनी लाभ घेतला पर्वणीनिमित्ताने डाॅ.विकासानंद मिसाळ महाराज यांच्या हस्ते अन्नदान महाप्रसाद हाॅलचे उद्घाटन करण्यात आले.                  

  सकाळी ६ वा.खंडोबा मंगलस्नान पूजा झाल्यावर सकाळी ७ वा.अभिषेक महापूजा आरती होऊन भाविकांना दर्शन खुले करण्यात आले सकाळपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती सकाळी ११ वा.देणगीदार आणि देवस्थानने २४ लाख रूपये खर्चून बांधलेल्या अन्नदान महाप्रसाद पहिला मजला हॉल चे उद्घाटन,भागवताचार्य ह.भ.प.डाॅ. विकासानंदजी मिसाळ महाराज यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड,उपाध्यक्ष गंगाराम बेलकर ,पोलीस निरीक्षक घनश्याम बळप,जि.प.सदस्य पांडुरंग पवार,विश्वस्त चंद्रभान ठुबे,किसन धुमाळ,मनिषा जगदाळे,अश्विनी थोरात,दिलीप घोडके,महेंद्र नरड, हनुमंत सुपेकर,बन्सी ढोमे,किसन मुंढे,देवीदास क्षीरसागर,माजी उपाध्यक्ष रामदास मुळे,जनार्दन महाराज मुंढे,गोपीनाथ घुले,सुरेश पठारे,जयसिंग मापारी,प्रदिप भाटे,सुरेश गुंजाळ,अनिल साळुंके,दिलीप गुंजाळ,सुरेश सुपेकर बाबाजी जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यानंतर मिसाळ महाराजांचा प्रवचन,दर्शनसोहळा पार पडला यावेळी देणगीदारांचा सन्मान देवस्थानकडून करण्यात आला दुपारी १२ च्या सुमारास देवाच्या उत्सवमूर्तीचे मंगलस्नानासाठी पालखी मिरवणुकीने टाक्याचा दऱ्याकडे प्रस्थान सुरू झाले या पालखीवर भाविक सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडारा खोबरे ची उधळण करीत पालखीचे दर्शन घेत होते टाक्याचा दरा येथे मिरवणूक आल्यावर ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात उत्सव मूर्तींना गंगास्नान घातले यावेळी भाविकांनी घरातून आणलेल्या देव्हाऱ्यातील टाक स्वरूपातील देवांनाही गंगा स्नान घालून देवभेट घडविण्यात आली.  हा सोहळा पारंपारिक व धार्मिक विधींनी कुलधर्म कुलाचार पार पाडल्याने भाविक कृतार्थ झाले यानंतर सार्वत्रिक तळी भंडार व महाआरती होऊन पालखी उत्सवमूर्तीसह मंदिरात परतली दुपारी १२ वा पासून आमटी भाकरी चा महाप्रसाद ग्रामस्थ जगताप,घुले, खोसे,डावखर,शिंदे,झावरे व ईत्यादी परिवार यांचेकडून यांच्याकडून भाविकांना देण्यात आला देवस्थान कडून पिण्याचे पाणी, वाहने पार्किंग व दर्शनबारी नियोजन करण्यात आले होते जय मल्हार विद्यालयाकडून स्वयंसेवकांचे काम करण्यात आले क्रांती शुगर कारखान्याच्या सुरक्षा पथकाने सुरक्षा व्यवस्था सांभाळली

COMMENTS