त्र्यंबकेश्वर - त्रंबकेश्वर मध्ये आज रविवारी भाविकांची सकाळीच मोठी गर्दी उसळली आहे. गर्दीचे स्वरूप लक्षात घेता आज सकाळी साधारण दहाचे सुमारास

त्र्यंबकेश्वर – त्रंबकेश्वर मध्ये आज रविवारी भाविकांची सकाळीच मोठी गर्दी उसळली आहे. गर्दीचे स्वरूप लक्षात घेता आज सकाळी साधारण दहाचे सुमारास श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने देणगी दर्शन बंद केले. दोनशे रुपये देणगी दर्शन भरून तिकीट घेऊन मंदिरात महा दरवाजाने जात येत होते ही सुविधा आज बराच काळ काही तास बंद होती. जे भाविक मोफत धर्मदर्शन पूर्व दरवाजा रांगेत आहेत. त्यांना दर्शन घडावे म्हणून देणगी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी अडीचच्या सुमारास गर्दी तशीच असल्याने सायंकाळी उशिरा देणगी दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. अर्थात गर्दी नियंत्रण झाली तर दरवाजा सायंकाळी उघडला जाईल.
गर्दीमुळे चक्क महाद्वाराच बंद ठेवावे लागले आहे.पूर्व दरवाजा रांग दुपारी अडीचच्या सुमारास आतील पेंडॉल भरून भरून गौतम तलावाजवळ पोहोचली . त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस गौतम तलाव आहे.दरम्यान तिकीट विक्री कक्ष बंद करण्यात आला होता. मंदिराच्या अंतर्गत भाविकांना आतील उत्तर दरवाजाने मंदिरात सोडले जात होते भाविक दर्शन घेवून दक्षिण दरवाजाने बाहेर पडत होते. थोडक्यात नंदिकेश्वराचे दर्शन दुरूनच करावे लागत होते. वरील निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले असले तरी पूर्व दरवाज्याकडील रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी जाणे येणे अवघड झाले होते गर्दीत अशी स्थिती पूर्व दरवाजाला झाली होती. पूर्व दरवाजाला स्वच्छतेचा अभाव होता. विश्वस्त कैलास घुले पाहणी करीत ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देवस्थानचे अधिकारी कार्यरत होते.आज दर्शन काही तास देणगी दर्शन बंद आहे.
COMMENTS