Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत रंगला हायहोल्टेज ड्रामा

आम्हाला अटक करा ; आपचा भाजप कार्यालयावर मोर्चा

नवी दिल्ली ः आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण स

राहुल वैद्यला जीवे मारण्याची धमकी |LokNews24 (Video)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
सांगली नदी पात्रात माश्यांचा खच 

नवी दिल्ली ः आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्या फिर्यादीवरून केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक विभवकुमार यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर आप आक्रमक झाली असून, मोदी सरकार आपच्या नेत्यांना तुरूंगात टाकत असल्याचा गंभीर केजरीवाल यांनी केला असून, रविवारी आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर मोर्चा काढत आम्हाला अटक करा अशी मागणी. त्यामुळे राजधानीमध्ये हायहोल्टेज ड्रामा रंगतांना दिसून येत आहे.

केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली रविवारी आपच्या प्रमुख नेत्यांनी दिल्ली भाजप कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला पक्ष संपवण्याच मिशन हातात घेतले आहे. आपल्याला संपवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन झाडू सुरू केले. देशभरात येत्या काळात आप भाजपसाठी धोका ठरू शकते म्हणून आतापासूनच पक्षाला संपवण्याच काम सुरू झाले आहे. ऑपरेशन झाडू अंतर्गत आपच्या मोठ्या नेत्यांना अटक केली जाईल, आप पक्षाचे बँक अकाऊंट सीज केले जातील, आप पक्षाच कार्यालय बंद करून पक्षाला रस्त्यावर आणण्याचा त्यांचा प्लॅन आहे. असे खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी केले. आपच्या एका एका नेत्याला भाजपवाले अटक करत आहेत. आज आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आम्हाला एकत्र अटक करा. आपण भाजप ऑफिसकडे इथून जाणार आहोत, पोलिस जिथे अडवतील तिथ आपण रस्त्यावर बसू, तिथेच पोलिसांनी अटक करावी, जर आज भाजपने अटक केली नाही तर अर्ध्या तासाने आपण पुन्हा माघारी येऊ, त्यांनी अटक केली नाही तर ही त्यांची हार असेल, असे आव्हानही अरविंद केजरीवाल यांनी दिले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त – आपने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेत भाजप कार्यालयाकडे मोर्चा सुरू केला आहे. त्यानंतर भाजप कार्यालयाच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांना भाजप कार्यालयाकडे जाण्यापासून रोखण्यात आले आहे. निदर्शनापूर्वी दिल्ली पोलिसांनी आपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ’आप’ने निदर्शनासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना मोर्चा काढू दिला जाणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

मोदींनी ऑपरेशन झाडू लॉन्च केले ः केजरीलांचा आरोप- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या मुख्यालयावर मोर्चा काढला असून त्यांच्यासोबत पक्षाचे नेते, खासदार आणि आमदारही उपस्थित आहेत. केजरीवाल 12 वाजता पक्ष कार्यालयात पोहोचले आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. केजरीवाल यावेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपला संपवण्यासाठी ऑपरेशन झाडू लॉन्च केले आहे. भाजपने आम्हाला संपवण्यासाठी तीन योजना आखल्या आहेत, पहिली योजना म्हणजे निवडणुकीनंतर पक्षाची खाती गोठवली जातील. दुसरी योजना म्हणजे पक्षातील बड्या नेत्यांना अटक होणार. तिसरी योजना म्हणजे पक्षाचे कार्यालय रिकामे केले जाईल. केजरीवाल म्हणाले आम्ही शांततेने भाजप कार्यालयाकडे कूच करू. जिथे पोलीस आम्हाला थांबवतील तिथे आम्ही बसू. अर्धा तास वाट पाहणार. पोलिसांनी आम्हाला अटक केली तर बरे होईल, नाहीतर हा त्यांचा पराभव असेल.

COMMENTS