Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊसवाडच्या त्या शेतकरी शेतमजूर कुटूंबास शिवसेने कडून एक लाखाची मदत  

शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांची सांत्वन पर भेट

चांदवड प्रतिनिधी -  ऊसवाड ता चांदवड येथे तीन दिवसांपूर्वी शेतकरी कुटुंबातील शेतमजूर महिला कै.मीना बटाव वय वर्ष अंदाचे ३५ वर्ष ही शेताच्या बांधावर

प्रेम प्रकरणातून जिवंत जाळलेल्या तरुणाचा मृत्यू | LOKNews24
हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
अल्लाह, आमच्या चुका पदरात घे; चांगुलपणाची आणखी एक संधी दे !

चांदवड प्रतिनिधी –  ऊसवाड ता चांदवड येथे तीन दिवसांपूर्वी शेतकरी कुटुंबातील शेतमजूर महिला कै.मीना बटाव वय वर्ष अंदाचे ३५ वर्ष ही शेताच्या बांधावरून जात असतांना तिचा वीज पडून मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यु ओढावल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.ह्या घटनेचे वृत्त समजताच तालुक्यातील शिवसैनिक यांनी मदतीचा एक हात पुढे करत महाराष्ट्र शासनाची देखील मदत मागितली आहेत.

 प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी तात्काळ बटाव कुटुंबियाची उसवाड येथे राख सावरण्याचा कार्यक्रम स्मशानभूमीत चालू असताना तिथे जाऊन सांत्वन पर भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि कुटुंबीयास तात्काळ एक लाख रुपयांची मदत  केली तसेच  मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी  शिवसेना तालुकाप्रमुख विकास भुजाडे , संदीप उगले,  फौजी नाना घुले,  दत्ता गांगुर्डे , दीपक शिरसाठ,  निलेश ढगे , दीपक भोईटे,  बापू आहिरराव,  विठ्ठल गांगुर्डे,  जनार्दन पवार , मनोज सुर्यवंशी, आदिसह गावातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS