नगर : थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अभ्यास सध्याच्या तरुणाईने केला पाहिजे.केवळ प्
नगर : थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा अभ्यास सध्याच्या तरुणाईने केला पाहिजे.केवळ प्रसिद्धीसाठी जयंती साजरी न करता फुले दांपत्यांचे गुण अंगीकारले तरच सुदृढ समाज निर्मिती होईल.असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक अशोक देवढे यांनी केले.
सावेडी उपनगरात गुलमोहर रोड पोलीस चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच च्या वतीने ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मंच चे प्रमुख योगेश साठे, अँड. लक्ष्मीकांत पठारे अँड.भरत शिंदे, ज्येष्ठ नागरिक अशोक देवढे,वसंत देवढे युवा कार्यकर्तेसचिन शेलार,भाऊ पानमळकर, किरण चव्हाण, प्रतीक जाधव, देविदास भालेराव, अशोक औटी,प्रकाश दासी, विक्रम गुंजाळ, बबन गाडे, रविराज गायकवाड, सागर दिवटे, खंडू पानमळकर, कार्यकर्तेउपस्थित होते.
युवकांना मार्गदर्शन करताना श्री.देवढे म्हणाले की क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांना समाजामध्ये सुधारणा घडविण्यासाठी शिक्षण, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, सामाजिक विषमता यावर महान कार्य केले. गुलामगिरी, अन्याय विरोधात आवाज उठविला. हे करताना सहनशीलता व संयम ठेवून कार्य चालू ठेवले. दलितांवर होणार्या अन्यायाचे विरोधात ते उभे राहिले. समाजाचा प्रमुख घटक माणूस आहे हे लक्षात ठेवून माणसांसाठी दूरदृष्टी ठेवून शिक्षण देण्याचे काम केले या सर्वांचे आत्मपरीक्षण तरुणांनी करावे, त्यांचे गुण प्रत्यक्ष अंगीकारल्याने त्यांची जयंती साजरी करण्याचे ध्येय,उद्दिष्ट आपले सार्थकी लागेल असे ते म्हणाले.
COMMENTS