Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे विधी महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यान

श्रीगोंदा : येथील नागवडे विधी महाविदयालयात ऍड.गणेश शिरसाठ यांचे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.प्रसाद इंगळे होते. या प्रसंगी शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपद्धती, संशोधनाची गोडी, उच्च शिक्षणाच्या संधी तसेच करिअरविषयक मार्गदर्शन देण्यात आले. व्याख्यानात वक्त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासासोबतच संदर्भग्रंथ वाचन, लेखन कौशल्य, तसेच सखोल विचार करण्याची सवय लावावी, असे आवाहन केले. विद्यापीठीन शिक्षणात गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिस्त, परिश्रम आणि जिज्ञासा महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी दिशा मिळाल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी यावेळी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे निरीक्षक एस. पी. गोलांडे, सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमोल नागवडे, उपाध्यक्ष ऍड. नरेंद्र भोस, श्रीगोंदा वकील संघाचे सदस्य ऍड. अशोक रोडे, ऍड. सुनील भोस, ऍड. अशोक वाळुंज, ऍड. जयंत शिंदे, ऍड. रोहित गायकवाड, ऍड. अक्षय मखरे, ऍड. सचिन कोरडकर, तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. गितेश सुरसे, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. जी. बी. नेवसे, ऍड. नितीन भिंगारदिवे, ऍड. संतोष दांगडे, प्रा. साक्षी  व वुमन कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह पूजा बेंद्रे  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अंजुला चौबे यांनी तर सूत्रसंचालन  ऍड.अक्षय फाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

श्रीगोंदा नगरपालिकेचा २२५ कोटींचा अर्थसंकल्प
शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते

COMMENTS