Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डीत संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रा

पाथर्डी ःविठ्ठल रुख्मिणी, संतश्रेष्ठ सावता महाराज प्राणप्रतिष्ठा व संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने पाथर्डी शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा का

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात
मित्राने आमच्याशी गद्दारी केली आहे, आमची मान कापली आहे…
दादा चौधरी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा

पाथर्डी ःविठ्ठल रुख्मिणी, संतश्रेष्ठ सावता महाराज प्राणप्रतिष्ठा व संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने पाथर्डी शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरवात कसबा येथील सावता माळी महाराज मंदिर येथून शंकर महाराज भक्ती मठाचे महंत माधव बाबा, मोहन महाराज सुडके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, शेवगाव पंचायत समितीचे शितीज घुले, अभय आव्हाड, डॉ. मृत्यूंजय गर्जे, नंदकुमार शेळके, रमेश गोरे, राजेंद्र दुधाळ, नामदेव लबडे, अमोल गर्जे, मंगल कोकाटे, महेश बोरुडे, संजय बोरुडे, बाळासाहेब सोनटक्के, आजिनाथ डोमकावळे, भाऊ तुपे, मंजाबाप्पू हंडाळ, ज्ञानेश्‍वर कोकाटे, हे उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या मूर्तींची शहरातून वाजत गाजत शोभा यात्रा काढण्यात आली. विठ्ठल, रुक्मिणी, राधा कृष्ण जोडी व संत सावता महाराज यांची वेशूषा साकारलेले चिमुकले गोपाळ, महिलांचे सामूहिक टाळ नृत्य, मुलींचे दांडिया, भजनी मंडळ यांचा ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरीचा गजर, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, बँड पथक आदी शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या शोभायात्रेमध्ये महिलांची लक्षणीय गर्दी होती. अजिनाथ डोमकावळे, विशाल बालवे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. 1 ते 3 ऑगस्ट दरम्यान होम हवन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद असे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. संतश्रेष्ठ सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती, मंदिर जिर्णोद्धार समिती, मंदिर ट्रस्ट, श्री महात्मा फुले मंडळ, श्री विजय हनुमान मंदिर ट्रस्ट व पावन गणपती प्रतिष्ठाणच्या व कसबा परिसरतील नागरिकांच्या मदतीने हे कार्यक्रम संपन्न होत आहे.

COMMENTS