चंद्रपूर : राज्यात मंगळवार प्रचारसभांचार वार ठरला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सभा घेतली. चंद्रपूरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी पुन
चंद्रपूर : राज्यात मंगळवार प्रचारसभांचार वार ठरला. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सभा घेतली. चंद्रपूरच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. चिमुरच्या सभेला उपस्थित असणार्या मतदारांच्या संख्येवरून या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे बहुमताचे सरकार अस्तित्वात येईल. त्यानंतर केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा विकासही दुप्पट वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या संकल्पपत्राचे कौतुक करत हे संकल्पपत्र महाराष्ट्राच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाची गॅरंटी असल्याचे स्पष्ट केले. महायुतीच्या संकल्पपत्रात लाडकी बहीण, शेतकरी, तरुण व महाराष्ट्राच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प करण्यात आलेत. एआय यूनिव्हर्सिटी असेल, वॉटर ग्रिड प्रकल्प असेल, प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणारी योजना असेल, पक्के घर असो किंवा डिजिटल कनेक्टिव्हिटी जाळे पसरवणे असो या सर्वांचा यात समावेश आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला या संकल्पपत्रासाठी शुभेच्छा देतो, असे मोदी म्हणाले.
भ्रष्टाचारात काँगे्रसची डबल पीएच.डी
महाराष्ट्राचा वेगवान विकास ही महाविकास आघाडीच्या हाताबाहेरची गोष्ट आहे. आघाडीने केवळ विकासाला ब्रेक लावण्याची पीएचडी केली आहे. कामांना अडवून ठेवण्यात काँग्रेसने डबल पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या अडीच वर्षांच्या काळात मेट्रोपासून वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाला रोखण्याचे काम केले. त्यामुळे आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू हे लक्षात घ्यावे. त्यामुळे पुन्हा त्यांना लुटीचा परवाना मिळवू देऊ नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
COMMENTS