बंगळुरू ः कर्नाटकातील बंगळुरूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पार्टी आटोपून मुलगी घरी परतत होती. त्यासाठी

बंगळुरू ः कर्नाटकातील बंगळुरूमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पार्टी आटोपून मुलगी घरी परतत होती. त्यासाठी तिने एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली. पोलिसांनी रविवारी (18 ऑगस्ट) या घटनेची माहिती दिली. बंगळुरूचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ही घटना घडली. पीडित तरुणी शनिवारी रात्री कोरमंगला परिसरात पार्टीसाठी गेली होती. सकाळी त्यांनी हेब्बागोडी भागातील आपल्या घरी परतण्यासाठी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेतली होती. दुचाकीस्वाराने तिच्यावर हल्ला केला आणि बलात्कार केला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
COMMENTS