Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत रिक्षामध्ये तरूणीवर अत्याचार

आरोपीला उत्तरप्रदेशातून केली अटक

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये रेल्वेमध्ये एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिस

आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट
उच्च शिक्षण संस्थाना उभारावे लागणार उद्यान
माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये रेल्वेमध्ये एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिसरात 20 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. रिक्षातच या तरुणीवर नराधमानं अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात भादंवि कलम 376 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोपीने महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, घटला प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीही तरुणीला दिली. तसेच, इंद्रजित सिंह असे आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने तरुणीला धमकावल्यानंतर तरुणीने भीतीपोटी घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठेच केली नाही. साधारणतः काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेची प्रसूती झाली होती. पण घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेच्या सर्व चाचण्या करुन घेतल्या. त्यावेळी डॉक्टरांना तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या. डॉक्टरांना संशय आला, त्यावेळी त्यांनी महिलेला विश्‍वासात घेऊन तिची चौकशी केली. त्यानंतर महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबियांना घडला प्रकार समजताच त्यांनी तात्काळ जवळचे पोलिस स्थानक गाठले आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती, तिथून तिने घरी परतण्यासाठी नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जन स्थळी नेली. तिथे त्याने आधी महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर नराधमाने महिलेला घडलेल्या घटनेबाबत कुठेच वाच्यता न करण्याबाबत धमकावले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्याने थेट उत्तरप्रदेश गाठले. दरम्यान, पोलिसांनी पीडितेकडून संपूर्ण माहिती घेऊन तात्काळ आरोपीला शोध सुरू केला. सर्वात आधी पोलिसांनी रिक्षाच्या मालकाला गाठले. त्यानंतर घटनेच्या दुसर्‍या दिवशीच चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सर्व माहिती घेऊन आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या.

COMMENTS