Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापुरात रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचार

मुंबई :बदलापूर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेने चर्चेत आले आहे. एका रिक्षाचालकाने तरूणीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पीडिते

गावात नको बार-नको वाईन शॉप; वाठारच्या महिला पाठोपाठ आता पुरूषांचीही सुर
माणसांच्या जगण्याची सुसंगत साहित्य मनाला भिडते ः चंद्रकांत पालवे
महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे फरार.

मुंबई :बदलापूर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेने चर्चेत आले आहे. एका रिक्षाचालकाने तरूणीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बीअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर तिला रिक्षाचालक मित्राकडे सोपवले. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पीडितेची मैत्रिण आणि रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारी ही 19 वर्षाची तरूणी शिक्षण घेत आहे. ती कुटुंबीयांसह मुंबईत राहते. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दत्ता जाधव, नायर या संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता या तिच्या रिक्षाचालक मित्राला सोबत बोलावून घेतले. यावेळी त्यांनी तिघांनी सोबत दारु पिली. दारु पिल्ल्यानंतर तरुणीची शुद्ध हरपल्यानंतर तिचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिच्या लक्षात हा प्रकार आला. याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

COMMENTS