Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालत्या रिक्षातील महिला प्रवाशांची पर्स व दागिने लुटणाऱ्या टोळीला अटक

कल्याण प्रतिनिधी - चालत्या रिक्षाचा  गतीरोधकावर वेग कमी होत असल्याची संधी साधत या रिक्षाचा पाठलाग करत रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांना मुदतवाढ
उत्तराखंडमध्ये अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १५ जणांचा मृत्यू
मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार

कल्याण प्रतिनिधी – चालत्या रिक्षाचा  गतीरोधकावर वेग कमी होत असल्याची संधी साधत या रिक्षाचा पाठलाग करत रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स किंवा दागिने खेचून पळणाऱ्या तीन आरोपींना खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अटक केली आहे. संकेत संजय केळकर १८ वर्षे, जय गोकुळ थोरात १८, अथर्व राजेश वाव्हळ २० अशी या आरोपींची नावे असून, हे तिन्ही आरोपी उल्हासनगर परिसरात राहणारे आहेत. बापगाव कडून कल्याण स्टेशनकडे रिक्षाने जाणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स निक्की नगर चौकाच्या पुढील गतिरोधकावर रिक्षाचा वेग कमी झाल्याची संधी साधत दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी सदर महिलेने खडकपाडा पोलिसात तक्रार दिली होती.  या आरोपीचा मार्ग काढताना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेतला. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या तरुणांनी चैन स्नाचींगचा मार्ग स्वीकारला.  या तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेली पर्स जप्त केल्याचे खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. 

COMMENTS