Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मॉलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद

4 पिस्टल जप्त ; 3 जण फरार, पुण्याच्या धायरी परिसरात कारवाई

पुणे ः धायरी परिसरातील डीएसके विश्‍व परिसरात स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या दरोडोखोरांच्या एका टोळीला अटक केल

कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत :शिवतारे ; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी
राज्य सरकारकडून 2 हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
उर्फी जावेदला पोलिस संरक्षण द्यावे

पुणे ः धायरी परिसरातील डीएसके विश्‍व परिसरात स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या दरोडोखोरांच्या एका टोळीला अटक केलीआहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेतले असून वैभव राऊत या आरोपीस अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपींचे तीन साथीदार पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलिस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनीआरोपी विरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी त्यांच्या कब्जात गावठी बनावटीचे चार पिस्टल वआठ जिवंत काडतुसे ही अग्नीशस्त्रे, एक लोखंडी कटावणी, एक स्क्रु ड्रायव्हर, लाल मिरची पावडरची एक पुडी, एक नॉयलॉनची हिरव्या रंगाची दोरी व एक मोटार सायकल असे सर्व मिळून एकूण एक लाख 14 हजार रुपयांची हत्यारे, पिस्टल व इतर साहित्य जवळ बाळगले. धायरी येथील डीएसके विश्‍व परिसरातील स्मार्ट पॉईंट मॉल येथे दरोडा घालण्याच्या उद्देशाने पूर्व तयारी करुन, दरोडा घालण्याच्या तयारीत असताना 17 वर्षाची दोन मुले मिळूनआले तर, इतरआरोपी पळून गेले. पोलिसांनी त्यानंतर शोध घेऊन एका अल्पवयीनआरोपीस ताब्यात घेतले व वैभव राऊत याआरोपींला अटक केली. पुणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेने कोणीही आपले कबजात लाठया काठया, अग्निशस्त्रे, स्फोटके बाळगणेचा मनाई आदेश असताना, सदरआदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुध्द भांदवि कलम 399, 402, सह भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25), महाराष्ट्र पोलिस अ‍ॅक्ट कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करतआहे.

COMMENTS