Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

पुणे : गुजरातमधील वडनगर, सिपौर, शहापूर, शहापूर वड, खानपूर, छबलिया या गावांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय असल

अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी 1 हजार कोटींची तरतूद
महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम आता 25 लाखांवर
इंजेक्शनची सुई 5 महिने मांडीतच

पुणे : गुजरातमधील वडनगर, सिपौर, शहापूर, शहापूर वड, खानपूर, छबलिया या गावांमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचे एका गुन्ह्याच्या तपासाच्या निमित्ताने चंदननगर पोलिसांना आढळून आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे सांगून सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला 23 लाख रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीला गुजरात येथील मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली आहे.

नवीन प्रवीणभाई चौहान (वय 22, रा. गोरिसाणा ता. खेरालू, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव शेरीतील एका ज्येष्ठ नागरिकाने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपीने ज्येष्ठ नागरिकाशी फोनद्वारे संपर्क साधला. ‘शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो,’ असे आमिष त्याने दाखविले. ज्येष्ठ नागरिकाचा विश्‍वास मिळवून आरोपीने 21 लाख 81 हजार 661 रुपये घेतले. त्यानंतर एक लाख रुपये पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने 22 लाख 81 हजार 661 रुपये वेळोवेळी पाठवले. गुंतवणुकीसंदर्भात चौकशी करण्यासाठी ज्येष्ठाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणाचा तपास करताना आरोपीचे बँक खाते आणि लोकेशन गुजरात येथील वडनगर येथे असल्याचे पोलिसांना समजले. चंदननगर पोलिस ठाण्यातील सायबर पथकाचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्‍वर रेवले, हवालदार भरत उकिरडे, शिपाई संतोष शिंदे यांचे पथक गुजरातला गेले. आरोपीला ट्रांजिस्ट रिमांडसाठी खेरालू प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता एक दिवसाची रिमांड मंजूर करण्यात आली. आरोपीला पुण्यात आणून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

COMMENTS