Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात काढली दोन हजाराच्या नोटेची अंत्ययात्रा

अकोला : दोन हजार रूपयांची नोट बंद केल्याने आता ही नोट बदलविण्यासाठी नागरीकांची लगबग आहे. मात्र या नोट बंदच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. यात आ

शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार
दहा दुचाकीसह पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या,स्थागुशाची कारवाई
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश

अकोला : दोन हजार रूपयांची नोट बंद केल्याने आता ही नोट बदलविण्यासाठी नागरीकांची लगबग आहे. मात्र या नोट बंदच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. यात आज अकोला येथे राष्ट्रवादीच्यावतीने दोन हजाराच्या नोटेची अंत्ययात्रा काढण्यात आली. सरकारने 6 वर्षापूर्वी नोटबंदी करून दोन हजार रूपयांची नोट छापत चलनात आणली होती. यानंतर आता रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट बंद केल्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयाबाबत अनेकांकडून टीका होत आहे. विरोधी राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यानुसार अकोल्यात देखील राष्ट्रवादीकडून निषेध नोंदविण्यात आला.

COMMENTS