Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनश्री महाडीक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण

इस्लामपूर / प्रतिनिधी : वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता महाडीक शैक्षणिक संकु

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा
मुदत संपल्यानंतर सदस्य अपात्रतेचा निर्णयाने जावळीत खळबळ
म्हसवड शहरात दहा दिवसांतून एकदा पाणी; म्हसवड नगरपरिषदे विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

इस्लामपूर / प्रतिनिधी : वनश्री नानासाहेब महाडीक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार, दि. 9 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता महाडीक शैक्षणिक संकुलात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडीक यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
हा कार्यक्रम आ. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा होणार आहे. रेठरेधरण येथील वाळवा शिराळा दूध संघाचे उद्घाटन तसेच वनश्री नानासाहेब यांच्यावरील स्मृतीग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बैठकीला भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडीक, कार्यकारी संचालक डॉ. प्रा. महेश जोशी, सतीश महाडीक, चेतन शिंदे, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सुजित थोरात उपस्थित होते.
या कार्यक्रमास आ. विनय कोरे, आ. नितेश राणे, खा संजयकाका पाटील, आ. प्रकाश आवाडे, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सी. बी. पाटील, वैभव नायकवडी, भाजप प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी पक्षप्रतोद विक्रम पाटील, नीता केळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडीक यांनी दिली

COMMENTS