नागपूर प्रतिनिधी- मित्राला स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं आणि स्वतः मित्राच्या बंद असलेल्या घरात जाऊन सोन्याच्या दागिन्यासह इतर सामान्यांची चोरी के
नागपूर प्रतिनिधी- मित्राला स्वतःच्या घरी जेवायला बोलावलं आणि स्वतः मित्राच्या बंद असलेल्या घरात जाऊन सोन्याच्या दागिन्यासह इतर सामान्यांची चोरी केली. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत हि घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी मित्राला अटक केली. आरोपी कैलास निमजे यांनी आपल्या मित्राला परिवारासहित आपल्याकडे जेवायला यायला सांगितलं मित्र परिवारासहित त्याच्या घरी आला. मात्र कैलास ने त्याला मला एक अर्जंट काम आल्याच सांगत आपल्याच घरी थांबवून तो बाहेर पडला आणि मित्राच्या घरी जाऊन त्याच्या घराचे कुलूप खोलत त्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. नंतर आपल्या घरी परत येऊन मित्रासोबत जेवण केलं. मात्र मित्र जेव्हा स्वतःच्या घरी पोहोचल्यानंतर त्याच्या घरात चोरी झाल्याचं त्याला दिसलं. त्याने पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासातच या चोर मित्राला ताब्यात घेतला

COMMENTS