Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी विद्यार्थिनीने 45 वर्षानंतर शाळेप्रती केली कृतज्ञता व्यक्त

श्रीरामपूर प्रतिनिधी : तालुक्यातील मालुंजे बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ए. के. औटी विद्यालयात 1977 साली इयत्ता दहावीच्या वर्गात गुणवत्ते

ताजनापूर लिफ्ट क्रमांक दोनबंधारे भरून द्यावेत
कर्जत महामार्गावर दुचाकींचा अपघात
मृतदेहाची नोंद न करता परस्पर अंत्यविधी करणार्‍यावर कारवाई व्हावी

श्रीरामपूर प्रतिनिधी : तालुक्यातील मालुंजे बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ए. के. औटी विद्यालयात 1977 साली इयत्ता दहावीच्या वर्गात गुणवत्तेत उत्तीर्ण झालेल्या जनाबाई भागवतराव बडाख (सासरचे नाव पुष्पाताई मधुकराव टेके) यांनी आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपणास साक्षर केले, त्या शाळेची माजी विद्यार्थिनी म्हणून शाळेला काहीतरी भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा ) रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या सुमारे 5 हजार रुपये किमतीच्या उच्चप्रतीच्या दोन प्रतिमा नुकत्याच शाळेत जाऊन कुटुंबीयासह नातेवाईकांच्या समवेत शाळेतील शिक्षकांकडे भेट म्हणून सुपूर्द केल्या.
        यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तब्बल 45 वर्षानंतर आपल्या शाळेत येऊन शाळेला काहीतरी भेट दिल्याच्या भावना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान देणारे होते. यावेळी उपस्थित शिक्षकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करीत कृतज्ञता व्यक्त केली. माजी विधार्थीनी बडाख-टेके यांचे सासर कोपरगाव तालुक्यातील वारी येथील आहे. त्यांचे पती प्रगतशील शेतकरी असून त्या गृहिणी आहेत. लोकमतचे उपसंपादक रोहित टेके यांच्या त्या मातोश्री आहेत. यावेळी मालुंजे येथील इंदुबाई बडाख, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष बाबुराव बडाख, वारकरी संस्थचे अध्यक्ष चांगदेव महाराज  बडाख, प्रगतशील शेतकरी सोपानराव बडाख, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव धोंडे, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर बडाख, दत्तात्रय भालेकर, जी.एन. बडाख, शिक्षक राधाकिसन टाकसाळ, संतोष जरे, दीपक कदम, रोहिणी दिवटे, कविता कोबारणे, मंदाताई धोंडे, नंदाताई कडूस, शितल बडाख, संध्या धोंडे, समृद्धी बडाख, राजवर्धन टेके, जयवर्धन टेके उपस्थित होते.

COMMENTS