बीड प्रतिनिधी - देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभा
बीड प्रतिनिधी – देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत ’डाईंग व प्रिंटींग’ (बांधणी व ब्लॉक प्रिंटींग) या विषयावर कार्यशाळाचे आयोजन दि.1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.या कार्यशाळेची यशस्वीरिता सांगता झाली.
या कार्यशाळेच्या उद्घाटनाला लता बच्यानी यांना आमंत्रित करण्यात आले होते.तर समारोप कार्यक्रमाला देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.रोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथील कर्मचार्यांना करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेमध्ये बांधणी व ब्लॉक प्रिंटींग, स्क्रीन प्रिंटिंग आदी विषयावर सखोल माहिती देत विद्यार्थ्यांना सदरील प्रकार शिकवण्यात आले. स्पर्धेमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या प्राचार्य अश्विनी बेद्रे यांच्या सह स.प्रा.वृषाली भोसले, स.प्रा.विद्या उघडे,स.प्रा. सय्यद शहाणा,स.प्रा.सुप्रिया ससाने,स.प्रा.रंजना जोगदंड व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
COMMENTS