Homeताज्या बातम्यामनोरंजन

विद्या बालनच्या नावाने बनवले बनावट सोशल मीडिया अकाउंट

मुंबई : बॉलिवूड कलाकार कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यापैकी एक म्हणजे विद्या बालन. अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. स

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया विरोधात कुस्तीपटूंचा निषेध
धर्मापेक्षा लोकशाही मोठी! 
कविता ही हृदयाची भाषा ती जगता आली पाहिजे ः कवी प्रकाश घोडके

मुंबई : बॉलिवूड कलाकार कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यापैकी एक म्हणजे विद्या बालन. अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विद्या सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नेहमीच अभिनेत्री स्वत:चे कॉमेडी रिल्स शेअर करुन तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. मात्र नुकतीच अभिनेत्रीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या नावाचं एक फेक अकांउन्ट बनवलं गेलं आहे. इतकंच नाही तर त्या फेक अकाउंन्टवरुन एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतील लोकांकडून पैसेही मागितले जात आहेत. याच प्रकरणात विद्याने या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिंसात FIR दाखल केली आहे. विद्या बालनने मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एका अनोळखी व्यक्तीने विद्या बालनच्या नावे इन्स्टाग्रामवर अकाउन्ट तयार केलं आणि यानंतर या अकांउन्टवरुन त्या व्यक्तीने पैशांची मागणी सुरु केली. आपण तुम्हाला काम देतो त्याबदल्यात त्या वक्तीने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. खार पोलिसांनी या प्रकरणात सेक्शन 66 (C) IT अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

COMMENTS