Homeताज्या बातम्याविदेश

‘हमास’सचे शिष्टमंडळ रशियात दाखल

ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू

मास्को ः इस्त्राईलच्या अनेक नागरिकांना हमास या संघटनेने ओलीस ठेवले असून, त्यांच्या सुटकेसाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. यावर चर्चा करण्यासाठी हमा

परीक्षा ‘नीट’; मात्र वाहतूक वेडीवाकडी..!
नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जामखेडमध्ये विवाहितेवर अत्याचार

मास्को ः इस्त्राईलच्या अनेक नागरिकांना हमास या संघटनेने ओलीस ठेवले असून, त्यांच्या सुटकेसाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. यावर चर्चा करण्यासाठी हमासचे शिष्टमंडळ मॉस्कोत दाखल झाले आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये काही रशियन नागरिकही आहेत. गाझा पट्टीतून इस्रायलवर तुफान हल्ले करून ताज्या युद्धाला तोंड फोडणार्‍या ‘हमास’ या अतिरेकी संघटनेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दाखल झाले आहे.
इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान हमासच्या अतिरेक्यांनी काही परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. या ओलिसांच्या सुटकेसाठी रशियाने पुढाकार घेतला असून यातून मार्ग काढण्यासाठी हे शिष्टमंडळ मॉस्कोत दाखल झाले आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये काही रशियन नागरिकांचाही समावेश आहे. या शिष्टमंडळात ‘हमास’ संघटनेचा वरिष्ठ नेता अबू मारझोक याचाही समावेश आहे. गाझा पट्टीमधून परदेशी ओलिसांची सुटका करण्याच्या अनुषंगाने रशियाने हमासच्या नेत्यांशी संपर्क केला होता. हमाससोबत झालेल्या चर्चेदरम्यान पॅलेस्टाइनमध्ये राहत असलेल्या रशियन आणि इतर परदेशी नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुनिश्‍चित करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे समजते. मध्य पूर्वेतील देशांमधील राजकारणात महत्वाची भूमिका वठवणारे इस्रायलसह इराण, पॅलेस्टिनी अथॉरिटी आणि गाझा पट्टीवर नियंत्रण करणारा अतिरेकी इस्लामी गट हमास गट या सर्वांशी रशियाचे उत्तम संबंध आहेत. अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीच्या अपयशामुळेच सध्या इस्त्रायल-पॅलेस्टाइनदरम्यानचे संकट उद्भवले असल्याचे रशियाने म्हटले होते. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम घडवून शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या उद्देशाने पुन्हा चर्चा सुरू करण्याचे आवाहन रशियाने केले आहे.

COMMENTS