Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याला बळ देणारा दिवस : पंतप्रधान मोदी यांची विश्‍वास

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धरतीवर 21 व्या युगात याच नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठे पाऊल उचलत आहोत. ते म्हणजे आपण एकत्रितपणे तीन

संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर
भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन धरतीवर 21 व्या युगात याच नौसेनेला सशक्त करण्यासाठी आपण मोठे पाऊल उचलत आहोत. ते म्हणजे आपण एकत्रितपणे तीन युद्धनौका नौसेनेत दाखल करत आहोत. आजचा दिवस देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याला बळ देणारा आहे. भारत हा विस्तारवादी नव्हे विकासवादाने काम करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काल बुधवारी मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये ’आयएनएस सुरत’, ’आयएनएस नीलगिरी’ आणि ’आयएनएस वाघशीर’ या तीन युद्धनौका राष्ट्रार्पण केल्या. यावेळी ते बोलत होते.
तिन्ही युद्धनौकांची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे करण्यात आली आहे. मुंबईत आगमन झाल्यावर पंतप्रधानांना नौदलाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. नौदलाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी या तिन्ही युद्धनौका ’मेड इन इंडिया’ असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी या युद्धनौका बनवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्यासह सर्व देशवासियांचे अभिनंदन केले. आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक मोठा दिवस आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 15 जानेवारी हा भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासाठी जीवन समर्पित करणार्‍या प्रत्येक वीराला मी नमन करतो. आपल्या देशाचील नौसेनेचा एक गौरवशाली इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौसेनेला नवीन सामर्थ्य आणि नवीन दृष्टीकोन दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्याचे भाग्य मला मिळाले. नौसेना सशक्त करण्यासाठी आपण मोठे पाऊल उचलत आहोत. भारताने जगाला सागर हा मंत्र दिला. समुद्राला सुरक्षित बनवायचे आहे, त्यादृष्टीने काम करूया, असे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले. दहशतवाद, हत्यारे आणि ड्रग्ज तस्करी विरोधात भारत खंबीरपणे उभा आहे. इंडो पॅसिफिकमध्ये सहकार्यावर भारताचा भर आहे, समुद्राला सुरक्षित बनविण्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे जगाचा भारतावरील विश्‍वास वाढला आहे. कोरोना काळातही भारताने चांगले काम केले. भारताने ’सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्याचे भाग्य मिळाले. जगाचा भारतावरील विश्‍वास वाढला. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिला. भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनत असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

COMMENTS