Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैन्यासाठी स्फोटके बनविणार्‍या कंपनीवर सायबर हल्ला

नागपूर : संरक्षण उत्पादनात देशातील आघाडीची कंपनी असलेली नागपुरातील सोलर ग्रुपवर सायबर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात हल्लेखोरांनी हा ह

समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल
लव्ह जिहाद समिती रद्द करा ः आमदार शेख

नागपूर : संरक्षण उत्पादनात देशातील आघाडीची कंपनी असलेली नागपुरातील सोलर ग्रुपवर सायबर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यात कंपनीची संवेदनशील माहिती चोरली असल्याची शक्यता असून खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी सायबर सेलने गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हा हल्ला गेल्या आठवड्यात झाला.‘ब्लॅक कॅट’ नावाच्या नावाच्या हॅकर्स ग्रुपने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात कंपनीची संरक्षण विषयक माहिती आणि काही आराखड्यांचा समावेश आहे. ही घटना कळताच कंपनीच्या अधिकार्‍यांनी यची माहिती ही पोलिसांना दिली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात आमच्याकडे तक्रार आल्याचे सांगत सायबर सेल पथकाकडून तपास सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले. सोलर ग्रुपकडून भारतीय सैन्यासाठीदेखील ‘मल्टीमोड ग्रेनेड्स’ बनविले जातात. ही देशातील आघाडीची कंपनी आहे. या सोबतच लष्कराला लागणारे अनेक संवेनशील उपकरणांची देखील ही कंपनी निर्मिती करते. संरक्षण दलाचे अधिकारी व नागपूर पोलिसांच्या अधिकार्‍यांचीदेखील बैठक झाली असून या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीचा अतिशय संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती लागला असण्याची शक्यता असून या प्रकारानंतर सोलर ग्रुपचे संकेतस्थळदेखील बंद करण्यात आले आहे.

COMMENTS