कोपरगाव प्रतिनिधी ः देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चां
कोपरगाव प्रतिनिधी ः देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. शंभर वर्षांचे आरोग्य मिळण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि चांगले अन्न मिळाले पाहिजे. योग्य नेतृत्व मिळाले तर समाजात सकारात्मक बदल घडतो, सरपंचांनी आपले अधिकार वापरताना योग्य आर्थिक नियोजन करून सेवावृत्तीने काम केले पाहिजे, असे मत औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाचे शिल्पकार तथा माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी व्यक्त केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा व निवडणुकीस सामोरे गेलेल्या उमेदवारांचा कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आदर्शगावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पेरे-पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक त्र्यंबकराव सरोदे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दत्तू नाना कोल्हे, कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक बाळासाहेब वक्ते, मनेष गाडे, विलासराव वाबळे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे, बापूराव बारहाते, ज्ञानेश्वर होन, निलेश देवकर, बाळासाहेब पानगव्हाणे, विलासराव आव्हाड, सतीश केकाण, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक अतुल काले, जनार्दन कदम, अशोक लकारे, दीपक जपे, दिपक चौधरी, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, शिल्पाताई रोहमारे आदींसह संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे तसेच भाजप, भाजयुमो, ग्रा. पं. चे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विवेक कोल्हे म्हणाले की, स्नेहलता कोल्हे यांनी आमदार झाल्यानंतर कोपरगाव तालुक्यात विकासाच्या अनेक योजना राबविल्या. तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण तहसील कार्यालयात तक्रार निवारण बैठक घेत असतो. त्यात सर्व सरपंचांनी आपापल्या गावातील समस्या मांडाव्यात. तालुक्यातील प्रलंबित प्रश्न शासनाकडे मांडून ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.शेवटी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी केले.
…तर, ग्रामीण भागाचा विकास शक्य ः विवेक कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी गावकर्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गावात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवाव्यात व गावचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. कोपरगाव तालुक्यातील विविध गावांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘जलजीवन मिशन’ च्या माध्यमातून 277 कोटीचा निधी दिला आहे. भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करावा लागेल. गावाच्या विकासासाठी ठोस काम करायची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही.
COMMENTS