पुणे ः पुणे शहरातील बाजीराव रस्त्यावरील हॉटेल गणराज प्युअर व्हेज या प्रसिध्द हॉटेलमधील 2 स्वयंपाक्यांत काम करताना अचानक रवा सांडल्याच्या किरकोळ क

पुणे ः पुणे शहरातील बाजीराव रस्त्यावरील हॉटेल गणराज प्युअर व्हेज या प्रसिध्द हॉटेलमधील 2 स्वयंपाक्यांत काम करताना अचानक रवा सांडल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर एका कुकने दुसर्या कुकवर थेट चाकूने जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी मंगेश दिंगबरराव सावळे (वय-36, मु. रा. असदपूर, शहापुरगाव, ता. चांदुरबाजार, अमरावती) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी राहुल रतनकुमार बिश्वास (वय-36, रा. बाजीराव रोड, पुणे) याने आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राहुल बिश्वास व आरोपी मंगेश सावळे हे दोघे हॉटेल गणराजमध्ये कुक म्हणून काम करतात. हॉटेलच्या किचनमध्ये आरोपीकडून रवा सांडला होता. त्यावरून त्याचे तक्रारदार राहुल बिश्वास याच्याशी किरकोळ वाद झाला. त्यानंतर तक्रारदार हे त्यांच्या हॉटेलचे काम संपवून हॉटेलच्या स्टाफ रुममध्ये आला. त्यावेळी आरोपी तिथे दारु पित थांबला होता. त्याने तक्रारदारासोबत सकाळी हॉटेलमध्ये झालेल्या भांडणाचा वाद उकरून काढला. त्याला वाईट शिवीगाळ केली. त्यावेळी तक्रारदार याचा भाऊ हा आरोपीस भांडणे न करण्याबात समजावून सांगत असताना, आरोपी हा तक्रारदार व त्याचे भावाचे अंगावर धाऊन जाऊन त्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर हॉटेलच्या स्टाफ रुममध्ये असलेल्या त्याच्या पेटीमधून त्याने चाकू घेऊन चाकूने तक्रारदार याच्या पाठीवर वार केला. त्यात तक्रारदार जखमी झाले. याबाबत पुढील तपास खडक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस मते करत आहेत.
COMMENTS