वसमत प्रतिनिधी - वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण मासानिमित्त देवदर्शन यात्रा परळी वैजनाथ,तुळजापूर,पंढरपूर

वसमत प्रतिनिधी – वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून पवित्र श्रावण मासानिमित्त देवदर्शन यात्रा परळी वैजनाथ,तुळजापूर,पंढरपूर यात्रेस बुधवार दी.23 पासून प्रारंभ झाला होता बुधवारी सकाळी ठीक 7 वा आमदार राजू भैया नवघरे यांच्या निवासस्थानापासून तब्बल 120 क्रुझर गाडी व इतर फोर व्हीलरअशा एकूण 155 गाड्या दिंडीत हरिनामाचा गजर करत वसमत येथून रवाना झाल्या यामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णवाहिका डॉक्टर औषध गोळ्या सोबत नेण्यात आली आहे. आमदार राजूभैया नवघरे यांनी आज गुरुवारी तुळजापूर येथे तुळजाभवानीची विधीवत आरती व पूजा केली देवीकडे एकच मागणं मागितलं बळीराजाला सुखी ठेव त्यांच्यावरचं दुष्काळाच सावट दूर होऊ दे भरपूर पाऊस पडू दे अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली. या या फक्त महिलांसाठी असून संपूर्ण वसमत विधानसभा मतदार संघातील प्रत्येक सर्कल मधून या यात्रेसाठी महिलांची नाव नोंदणी आ.राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान कडून करण्यात येत असल्याचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे यांनी सांगितले.
COMMENTS