Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी - रस्ता ओलांडणार्‍या पाच वर्षिय बालिकेला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला

एक्सप्रेसवर कंटेनरचा झाला ब्रेक फेल
गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक
ट्रक ऑटो चा भीषण अपघात ;नवविवाहिता जागीच ठार l LokNews24

औरंगाबाद प्रतिनिधी – रस्ता ओलांडणार्‍या पाच वर्षिय बालिकेला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव रोडवरील आंबेडकरनगरसमोर मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
अन्वी प्रताप मोरे (5.रा. फुलेनगरे, सिडको एन 7) असे मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, अन्वी ही मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तिच्या आईसह आंबेडकरनगरकडून सिडको एन कडे पायी रस्ता ओलांडत होती. यावेळी चिमुकलीने आईच्या हाताचे बोट सोडून ती तिच्या मागेपुढे चालत असतानाच सिडको बसस्टॅण्डकडून हर्सल टी पॉईंटकडे भरधाव मोटारसायकलचालकाने अन्वीला जोराची धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता की, अन्वी गंभीर जखमी होऊन घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या घटनेंतर तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी अन्वीला तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी सिडको पोलीस ठाण्यात दुचाकीचालकाविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी दुचाकीचालकाविरोधात अन्वीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

COMMENTS