Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला 

आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप आहे

बीड प्रतिनिधी  - बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल

दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव द्या
खोटे कथानक पसरवणार्‍यांना सडेतोड उत्तर द्या ः मुख्यमंत्री शिंदे
 निपाणा गावातील मुख्य मार्गावर घाणीचे साम्राज्य

बीड प्रतिनिधी  – बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील ८ देवस्थानाच्या जमीनी लाटल्याचा आरोप सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर केला आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, मनोज रत्नपारखे आणि अस्लम पठाण यांच्यासह अनेक लोक यामध्ये सामील आहे. अखेर आज सुरेश धस यांच्यासह संबधितांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष बाब म्हणजे, औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणातील तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे सांगितले होते. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र जे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते, तेच आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. त्यानंतर बीडच्या लाचलुचपत पथकाने मंगळवारी रात्री उशीरा आमदार सुरेश धस यांच्यासह संबधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

COMMENTS