Homeताज्या बातम्यादेश

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पाविरोधात पॉक्सोतंर्गत गुन्हा दाखल

बंगळुरू ः कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 व

डोंगरावरुन कोसळलेला मोठा दगड दुचाकीवर पडला , पाहा आगळावेगळा अपघात
महिलांना एस टी बस मध्ये 50 % सुट दिल्याच्या विरोधात टॅक्सी चालक संघटने कडून आंदोलन
नगरमध्ये विठू नामाचा…रंगला गजर

बंगळुरू ः कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा येडियुरप्पांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री म्हणजेच 14 मार्चच्या रात्री उशिरा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला. 17 वर्षांच्या मुलीच्या आईने लैंगिक अत्याचाराची तक्रार त्यांच्याविरोधात नोंदवली. त्यानंतर त्याच प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर येडियुरप्पांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याचा कायदा म्हणजेच पोक्सोच्या अंतर्गत येडियुरप्पांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईने गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 या दिवशी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.

COMMENTS