Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात बेकायदा सावकारकी गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बेकायदा सावकारकी व्यवसायाच्या प्रकरणांनी उचल खाल्ली असून, सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीनुसार धामो

संजीवनीच्या सहा अभियंत्यांची सॅनी कंपनीत नोकरीसाठी निवड
सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
औषधनिर्माण क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडवणारे केंद्र

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बेकायदा सावकारकी व्यवसायाच्या प्रकरणांनी उचल खाल्ली असून, सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त तक्रारीनुसार धामोरी येथील जगदीश शिवाजी उगले आणि बाभुळगाव येथील दत्तात्रय मच्छिंद्र कजबे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे तालुक्यातील बेकायदा सावकारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

                 याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की सहाय्यक निबंधक कार्यालयाला मिळालेल्या तक्रारींनुसार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी धामोरी येथील जगदीश शिवाजी उगले याच्या घराची झडती घेण्यात आली. तपासादरम्यान त्याच्या घरातून बेकायदा सावकारकीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली, ज्यामुळे तक्रारदाराने केलेल्या आरोपांची पुष्टी झाली. त्याचप्रमाणे, बाभुळगाव येथील दत्तात्रय मच्छिद्र कजबे याच्या घराचीही झडती घेण्यात आली.त्याच्या घरातून कोणतीही कागदपत्रे मिळाली नसली, तरी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याने सावकारकीचा व्यवसाय केल्याचे निष्पन्न झाले. बेकायदा सावकारकीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, भविष्यात अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सरकारच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या या पावलामुळे तालुक्यातील सावकारकी व्यवसायाला कायद्याचे बंधन लावले जाईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 ■ सहकार खात्याची फिर्याद

सहकार अधिकारी गिरीष काशिनाथ मुसळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय कजबे याच्यावर, तर बाळासाहेब विठ्ठल रासकर यांच्या फिर्यादीवरून जगदीश उगले याच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेकायदा सावकारकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे.

■ सावकारांमध्ये घबराट

सावकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणानंतर राहुरी तालुक्यातील अनेक बेकायदा सावकारकी करणाऱ्या इतरांवरही अशाच प्रकारची कारवाई होऊ शकते, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. या प्रकरणामुळे सामान्य कर्जदारांनाही दिलासा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

■ सामाजिक परिणाम

या कारवाईमुळे बेकायदा सावकारकीवर आळा घालण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सावकारकीविरोधात केलेली ही कारवाई तालुक्यातील इतर पीडितांना गुन्हे दाखल करण्यास प्रवृत्त करू शकते

COMMENTS