Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघड; दोन संशयित ताब्यात

अहिल्यानगर : शहरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोगस मतदानाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी प्

पुण्यात 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
मजूर पाहायला आलेल्यांना राहुरीत लुटले

अहिल्यानगर : शहरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बोगस मतदानाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय येथील मतदान केंद्रावर संशयास्पद हालचाली लक्षात घेत हस्तक्षेप केला. यावेळी काही व्यक्ती बोगस मतदान करत असल्याचा आरोप करण्यात आला.
तपासादरम्यान एका संशयिताच्या खिशातून मोठ्या प्रमाणात, सुमारे पन्नास बनावट आधारकार्ड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, बोगस मतदानाच्या आरोपांमुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे काही वेळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती.
प्रकरणाची चौकशी सुरू असून, बोगस मतदानामागे नेमके कोण आहे आणि किती प्रमाणात गैरप्रकार झाला आहे, याचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्‍वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

COMMENTS