राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली 

Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली 

पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला

राजस्थान प्रतीनिधी - राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रद

मुलांना विष देत जोडप्याची आत्महत्या
६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
गर्दीने भरलेल्या बसमधून शालेय विद्यार्थी पडला रस्त्यावर

राजस्थान प्रतीनिधी – राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातला हा व्हिडीओ आहे. 5 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. नेहमीप्रमाणे एक तरुण ऑफिसमध्ये आला होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर या तरुणाने पेपर घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. पेपर चाळत असताना अचानक या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला. हा तरुण कोसळल्यामुळे ऑफिसमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात घेऊन गेले. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

COMMENTS