Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोठल्याच्या दगडफेक प्रकरणी खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल

दोघांना केली अटक, पोलिस घेताहेत आणखी 18 ते 20जणांचा शोध

अहमदनगर/प्रतिनिधी ः मकरसंक्रातीच्या दिवशी (रविवारी, 15 जानेवारी) सायंकाळी मंगलगेट परिसरात पतंगोत्सवातील गाण्यांवरून झालेल्या दोन समाजाच्या गटातील

मंत्री असतांना एमआयडीसीचा प्रश्‍न का सोडवला नाही
कोल्हे व गणेशनगर कारखान्यावर विवेक कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहन
स्वतःची उद्योजकीय मानसिकता विकसित करा – अभिनाथ शिंदे

अहमदनगर/प्रतिनिधी ः मकरसंक्रातीच्या दिवशी (रविवारी, 15 जानेवारी) सायंकाळी मंगलगेट परिसरात पतंगोत्सवातील गाण्यांवरून झालेल्या दोन समाजाच्या गटातील दगडफेकप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात 18 ते 20 जणांविरुध्द खुनाचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गटातील जखमी सुमित कैलास सुरसे (वय 25 रा. जे.जे.गल्ली, मंगलगेट) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शहेबाज बॉक्सर, तौसिफ उर्फ ताऊ शेख, अदनान शेख, बब्बू खान, शाकिर अजिज शेख, सलमान मेहबूब खान, मोसिम सादिक शेख व इतर 10 ते 12 अनोळखींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सलमान खान व मोसिम शेख यांना अटक केली आहे.

सुरसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, रविवारी सायंकाळी मंगलगेट जे. जे. गल्लीतील लक्ष्मी किराणा दुकानासमोर उभा असताना घास गल्लीकडून मक्का मशीद रोडने शहेबाज बॉक्सर याच्यासह त्याचा लहान भाऊ तौसिफ उर्फ ताऊ शेख, अदनान शेख, बब्बू खान, शाकिर अजिज शेख, सलमान खान, मोसिम सादिक शेख व इतर 10 ते 12जण हातात हत्यारे व दगडे घेऊन आरडाओरडा व दहशत निर्माण करीत पळत आले व त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यांच्या दहशतीला घाबरून लोकांनी पळापळ केली. त्यावेळी गल्लीतील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली व रहिवासी लोकांनी आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घरात जाऊन बसले. तर काही लोक त्यांच्या दुचाकीवर बसून निघून गेले. या ठिकाणी सुमारे 150 ते 200 जण आरडाओरडा, शिवीगाळ करीत होते. मी त्यांच्या दहशतील घाबरून माझे दुकान बंद करीत असताना त्यातील एकाने माझ्या डोक्यात जोरात दांडके मारले, त्यावेळी मी मागे वळून पाहिले असता शहबाज बॉक्सर याने शिवीगाळ करून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील धारदार कोयत्याने माझ्या पोटात वार केला असता मी जोरात मागे सरकल्यामुळे तो कोयत्याचा वार माझ्या डाव्या हाताच्या कोपर्‍यावर लागून जखमी झालो असल्याचे सुरसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच मला वाचविण्यासाठी माझी आई कविता सुरसे व चुलती मनीषा सुरसे जवळ येत असताना जमावातील लोकांनी त्यांना दगडे व विटा फेकून मारल्यामुळे त्या पुन्हा घराच्या दिशेने पळत गेल्या. तसेच जमावातील लोकांनी मला हातातील दांडक्याने, दगडाने, लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले, मोबाईल फोडला, दुकानासमोर लावलेली अ‍ॅक्सेस मोटारसायकलची (क्रमांक एमएच 16 सीपी 7244) तोडफोड करून नुकसान केले तसेच नितीन सुरसे यांच्या अल्टो झोन कारच्या (क्रमांक एमएच 16 एजे 6893) काचा फोडून नुकसान केले. कविता सुरसे व मनीषा सुरसे यांना देखील दगडफेकीमध्ये हाताला मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून गुन्ह्यातील आरोपींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

COMMENTS