Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात सात जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीगोंदा ः श्रीगोंदा येथे ग्रामपंचायतीसमोर फिर्यादी तुकाई देवीच्या पालखीसमोर नाचण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोल

सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गाचे निघाले टेंडर
स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन
अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक

श्रीगोंदा ः श्रीगोंदा येथे ग्रामपंचायतीसमोर फिर्यादी तुकाई देवीच्या पालखीसमोर नाचण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात 7 जणांविरूद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी विकास जोगदंड, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखील चंद्रकांत घोलप, महादु पांडुरंग घोलप, वसंत पांडुरंग घोलप, विशाल शिवाजी घोलप, अविनाश शिवाजी घोलप, शिवाजी मुरलिधर घोलप व विजय अंबादास घोलप सर्व रा. अनगरे ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर यांच्यावर गु.रजि.नं 882/2023 नुसार भा.द.वि.कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 341, 506 नुसार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या  चे सुमारास अनगरे ता. श्रीगोंदा येथे ग्रामपंचायत समोर फिर्यादी हे तुकाई देवीच्या पालखीसमोर नाचत असताना, निखील चंद्रकांत घोलप, महादु पांडुरंग घोलप, वसंत पांडुरंग घोलप, विशाल शिवाजी घोलप, अविनाश शिवाजी घोलप, शिवाजी मुरलिधर घोलप,व विजय अंबादास घोलप सर्व रा. अनगरे ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर यांनी मला तसेच राजु मनोहर जोगदंड, गौतम गुलाबराव जोगदंड, दत्तु दादा जोगदंड, राजु दादा जोगदंड सर्व रा. अनगरे ता. श्रीगोंदा यांना विशाल घोलप व अविनाश घोलप यांनी तुम्ही…लोक गावातील प्रत्येक कामात खोडा घालता, लाईटच्या पोलच्या कामात सुध्दा तुम्ही खोडा घातला. तुम्ही आमचे देवीचे पालखीसमोर नाचायचे नाही तुम्ही तुमच्या समाज मंदीरासमोर जावुन काय करायचे ते करा. असे म्हणुन निखील चंद्रकांत घोलप याने त्याचे कंबरेचा पट्टा काढुन राजू मनोहर जोगदंड याचे पाठीत मारहाण केली. तसेच अविनाश शिवाजी घोलप याने तेथे पडलेली काच हातात घेवुन फिर्यादीचे हाताचे बोटावर मारुन दुखापत केली आहे. तसेच इतर लोक यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळी करुन खाली पाडुन लाथाबुक्यांने मारहाण करुन तुम्ही या रस्त्याने मंदीराकडे जायचे नाही असे म्हणुन फिर्यादीचा रस्ता अडवून तुम्ही… लोक खूप माजले आहात आम्ही तुमच्याकडे पाहुन घेतो असे म्हणून जातीवाचक शिवीगाळी करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जखमींना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे करीत आहेत.  

COMMENTS