नेवाशातील त्या घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल ; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील त्या घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल ; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : नेवासे बुद्रुक गावातील पुरातन वास्तूमधील तोडफोड प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मागील काही दिवसांपा

कोपरगावात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन
पढेगाव ग्रामसभेत मांडला प्रशासनाच्या उणिवांचा लेखाजोखा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना जयंती निमित्त अभिवादन

अहमदनगर/प्रतिनिधी : नेवासे बुद्रुक गावातील पुरातन वास्तूमधील तोडफोड प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेची चर्चा होती. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हिंदू-मुस्लिम समाजाशी संबंधित घटना असल्याने या दोन्ही समाजात तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे व त्यानुसारही पोलिस तपास सुरू करण्यात आला आहे.
नेवासा परिसरातील हिंदू धर्मियांच्या सांगण्यानुसार नारदमुनी मंदिर व मुस्लीम धर्मियांच्या सांगण्यानुसार सागवली दर्गा असलेल्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन वास्तूमधील कबरीची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी व धार्मिक भावना दुखवाव्या या हेतूने छेडछाड करून मंदिराचे व कबरीचे नुकसान केले आहे. या घटनेची चर्चा मागील 8-10 दिवसांपासून सुरू आहे. पोलिसांना व प्रशासनाला ही घटना समजल्यावर या प्रकरणी प्रशासनाने तातडीने घडलेल्या ठिकाणी भेट देऊन तेथील तोडफोड झालेल्या भागाची दुरुस्ती केली. या प्रकरणी नेवासा पोलिसात पोलिस नाईक प्रतापसिंह भगवान दहिफळे (नेमणूक नेवासा पोलिस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम 153 (अ), 295 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिस घटनास्थळी पोहचल्याने व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून वातावरण नियंत्रणात आणले. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत. परिसरात शांतता आहे व कोणताही तणाव नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या धार्मिक ठिकाणाच्या हक्काबाबत वाद सुरू असल्याची माहिती समजते.

COMMENTS