Homeताज्या बातम्यादेश

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर बिहारमध्ये गुन्हा दाखल

पाटणा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात बिहारच्या पाटणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी 1

ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
शिवसेनेत आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती : अब्दुल सत्तार यांची नाराजी| LOKNews24
पुण्यात मायलेकराची हत्या; पती फरार असल्यानं गूढ l DAINIK LOKMNTHAN

पाटणा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात बिहारच्या पाटणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बिहारी कामगारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडचे नेते मनीष सिंह यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिहारमध्ये येऊन आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बिहारींची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात मनीष सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरील जबाबदार व्यक्तीने अशी वक्तव्ये करू नयेत. अशी वक्तव्ये करून लोकांना आपापसात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. जर प्रमोद सावंत यांनी माफी मागितली नाही तर त्यांना कोर्टात येऊन उत्तर द्यावे लागेल. बिहारमधील लोक त्यांच्या क्षमतेच्या जोरावर राज्याबाहेर राहतात. आपल्या प्रतिभेच्या बळावर बिहारी लोकांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला आहे. देशातील अनेक आयएएस, आयपीएस आणि आयआयटी अभियंते बिहारमधून बनलेले आहेत. हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती करून घ्यावे असे सिंह यांनी म्हंटले आहे.
गेल्या 1 मे रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते की, गोव्यातील बहुतांश गुन्हे हे यूपी-बिहारमधील लोक करतात. गोव्यातील 90 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांमध्ये येथील परप्रांतीय असलेल्या बिहारमधील मजुरांचा सहभाग असतो.  दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी बिहारी जनतेचा अपमान केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हे वक्तव्य लाजिरवाणे आहे. त्यांनी बिहार आणि बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे. भाजप नेते बिहारच्या लोकांचा इतका द्वेष का करतात..? असा सवालही तेजस्वी यांनी उपस्थित केला.

COMMENTS