Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाईत विनयभंग प्रकरणी दोन रोडरोमियोवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई प्रतिनिधी - महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असताना अंबाजोगाईत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन रोडरोमियोवर शनिवार, दि. 1 ज

मुंबई महापालिकेची 3 हजार कोटी पाणीपट्टी थकली
बोल्हेगाव, नागपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट… नागरिक आक्रमक…
रजनीकांतला जेलरच्या नफ्यातून मिळाले 100 कोटी

अंबाजोगाई प्रतिनिधी – महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असताना अंबाजोगाईत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन रोडरोमियोवर शनिवार, दि. 1 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय पिडीता ही शिक्षणासाठी अंबाजोगाईत राहते. शहरातील नावाजलेल्या परिसरात दोन रोडरोमियोंनी पिडीतेचा  संगनमत करून, विना नंबरच्या मोटार सायकलवर बसून, सतत पाठलाग केला. हॉर्न वाजवून छेडछाड केली. विनयभंग केल्याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात आकाश नागोराव डोंगरे (वय 21) आणि वैभव नामदेव चाटे (वय 21) या दोघांवर गुन्हा रजि.नं.2023 कलम 354, 354(ड), 504, 506, 34 भादंवी सह कलम 8, 12 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरिक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक शिंगाडे या तपास करीत आहेत.

रोडरोमियोंची गय केली जाणार नाही – अंबाजोगाई शहरात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीनी मुलींची जर कोणी रोडरोमियो छेड काढीत असेल तसेच त्यांना जाणिवपुर्वक त्रास देत असेल त्या मुली आणि विद्यार्थीनींनी किंवा त्यांच्या पालकांनी त्यांनी घाबरून जावू नये, शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलिसांना माहिती द्यावी अशा रोडरोमियोंना कायद्याचा बडगा दाखवून जरब बसविण्यात येईल, रोडरोमियोंची कसलीही गय पोलिस प्रशासन करणार नाही.

COMMENTS